हरभरा बियाण्याला बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी. by RFIS-ADVISORIES published on 2022-10-20T11:28:31Z रिलायन्स फाऊंडेशन आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ,यांच्या सयुक्त विद्यमाने कृषी विषयक सल्ला याप्रमाणे हरभरा बियाण्याची उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेत बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास ट्रायकोडर्मा ४०-५० ग्रॉम किंवा टेबूकोनॅझोल ५.४ टक्के एफ.एस. प्रती ४ मि.ली. किंवा थायरम ३० ग्रॉम किंवा कार्बेनडाझिम २० ग्रॉम प्रति १० किलो बियाण्यास चोळावे. यानंतर १० किलो बियाण्यास रायझोबियम जिवाणू संवर्धनाचे २५० ग्रॉम वजनाच्या एका पाकिटातील संवर्धन गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे.धन्यवाद!!