हरभरा पिकास मर व मूळकूज रोगाचा प्रादुर्भाव by RFIS-ADVISORIES published on 2023-01-28T09:51:44Z रिलायन्स फाउंडेशन आणि डॉ. राजेंद्र जाणे,किटक शात्रज्ञ ,यांच्या सयुक्त विद्यमाने,कृषी विषयक सल्ला याप्रमाणे हरभरा पिकास मर व मूळकूज रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रथम शेतातील प्रादुर्भावग्रस्त झाड उपटून शेताबाहेर नष्ट करावे. प्रादुर्भावग्रस्त पिकाला ओलीत करण्यापूर्वी प्रथम बुरशीनाशकाची ड्रेचिंग करावी व नंतरच ओलीत द्यावे. प्रादुर्भावग्रस्त झाडाभोवती कार्बन्डेझीम १० ग्रॉम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड २५ ग्रॉम किंवा जैविक ट्रायकोडर्मा बुरशी १ लिटर प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून जमिनीवर ड्रेचिंग करावे. प्रभावी नियंत्रणासाठी पिकाची फेरपालट करणे गरजेचे आहे.अधिक माहिती साठी रिलायंस फाउंडेशनच्या नि:शुल्क क्रमांक १८०० ४१९ ८८०० या वर संपर्क साधावा.धन्यवाद!