मका वरील लष्करी आळी/फॉल आर्मी वर्म/ स्पोडोप्टेरा / फ्रुजीपेरडा या आळीचा प्रादुर्भाव by RFIS-ADVISORIES published on 2023-01-28T09:53:21Z रिलायन्स फाउंडेशन आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी,यांच्या सयुक्त विद्यमाने, कृषी विषयक सल्ला या प्रमाणे उशीरा पेरणी केलेल्या मका मक्यावरील लष्करी आळी/फॉल आर्मी वर्म/स्पोडोप्टेरा/ फ्रुजीपेरडा या आळीचा प्रादुर्भाव दिसताच प्रादुर्भाव ग्रस्त पिकावरील अंडीपुंज गोळा करून नष्ट करावेत तसेच इमामेक्टीन बेन्झोएट ५ जी या किटकनाशकाची ४ ग्रॉम प्रती १० लिटर पाण्यातून फवारणी करावी तसेच गरज भासल्यास ८ ते १० दिवसांनी थायमेथोक्झाम १२.६ टक्के अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ९.५ टक्के या मिश्र कीटकनाशकाची ५ मि.ली.प्रती १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.अधिक माहिती साठी रिलायंस फाउंडेशनच्या नि:शुल्क क्रमांक १८०० ४१९ ८८०० या वर संपर्क साधावा.धन्यवाद!